कर्जतमधील कशेळे येथे सोनाऱ्याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोनाऱ्याकडून उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने सोनाऱ्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी हा अपघात असल्याचा बनवा केल्याचे समोर आहे. हरीष उर्फ हरिसिंग माधोसिंग राजपूत असे हत्या करण्यात आलेल्या सोनाऱ्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पेण येथील ५७ लाख रुपयांच्या एटीएम चोरी प्रकरणाची उकल; रायगड पोलिसांकडून चौघांना अटक

कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे व्यवसायिक हरीष उर्फ हरिसिंग बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नेरळ पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता जिते गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आला होता. त्यांची मोटर सायकल अपघातग्रस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरावर धारधार हत्यारांनी वार केल्याचे दिसून आले होते. यानंतर या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०२२ रोजी खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला पाचारण केले. यानंतर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे आणि त्यांच्या पथकांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. घटनास्थळा जवळील मोबाईल सिडीआर डेटा तपासण्यात आला. जवळपासचे सिसीटीव्ही फुटेज तपासले गेले. तपास कौशल्याचा वापर करून जनार्दन कराळे, आणि रोशन धुळे या दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी हिस्का दाखवल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. विरार येथील अन्य चार आरोपींच्या मदतीने सोनाराचा काटा काढल्याचे कबूल केले. यानंतर सनी मनमोहन गिरी, सुरज दिपक जाधव, तानाजी बाबुराव चौगुले आणि धगनराम भिमारामजी पटेल याना विरार आणि सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा- किचन महाराष्ट्रात तर हॉल तेलंगणमध्ये… दोन राज्यांच्या सीमांमुळे विभागलेल्या पवार कुटुंबाच्या अजब घराची गजब गोष्ट

उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून तसेच सोनाराला लुटण्याच्या उद्देशाने जनार्दन कराळे यांनी आपल्या साथिदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडूलकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ३६ तासांच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused arrested in case of murder of gold trader at kashele in alibag dpj
First published on: 16-12-2022 at 17:00 IST