वाडा बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत असणारी अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. वाडा शहरातून नाशिक-खर्डीकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक व्यापारी तसेच हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणकर्त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वी नोटीसाही दिल्या होत्या. मात्र स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी या कारवाईस खो घातला होता.
गेल्या महिन्यात शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाडा ग्रामपंचायतीस पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2013 रोजी प्रकाशित
वाडा बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
वाडा बाजारपेठेत मुख्य रस्त्यालगत असणारी अनधिकृत बांधकामे धडक कारवाई करून मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली. वाडा शहरातून नाशिक-खर्डीकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक व्यापारी तसेच हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले होते.
First published on: 12-06-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against unauthorized work in vada market