वाई: कराड ते सातारा महामार्गावर गुटख्याची अवैध वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल बोरगाव (ता सातारा) पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पुणे बंगलोर महामार्गावर कराड ते सातारा या रस्त्यावर गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे बोरगाव (ता सातारा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत काशीळ ते नागठाणे दरम्यान पोलीस गस्त घालत होते. मौजे अतीत गावच्या हद्दीत कराड ते सातारा मार्गीकेवर वाहन क्रमांक (एम एच ०९जीटी १३५५) हे संशयित वाटल्याने त्यास थांबवून त्यावरील चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये हिरा पान मसाला, रॉयल ७१७, टोबॅको गुटखा व वाहन असा एकूण पंचवीस लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत माल (गुटखा) तसेच वाहन ताब्यात घेतलेले आहे.

Residents of Santacruz and Khar, Residents of Santacruz and Khar Oppose bmc's Elevated Route, BMC Administration to Study Citizens Instructions, Santacruz, Khar, khar subway, Santacruz news, khar news, Santacruz Khar Elevated Route,
खार सब वेवरील उन्नत मार्ग प्रकल्प रद्द होणार ? नागरिकांच्या सूचनांचा प्रशासन अभ्यास करणार
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
mumbai, Khar subway, bridge on the Khar subway , residents opposed proposed bridge, residents near khar, residents of khar subway, khar subway news, mumbai news,
मुंबई : खार भुयारी मार्गावरील प्रस्तावित पुलाला स्थानिकांचा वाढता विरोध, निवासी भागातील पुलाच्या अरेखनाला विरोध
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक

आणखी वाचा-सांगली : कौटुंबिक वादात महिलेचा दगडाने ठेचून खून

सदर बाबत सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा विभाग अधिकारी सातारा अपर्णा भोईटे तसेच अन्न सुरक्षा विभाग अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठलराव रुपनवर, इम्रान समीर हवलदार, प्रियांका नामदेव वाईकर यांना कळविल्या नंतर त्यांनी मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी बाबासो बंडा मडके व दिपक कल्लापा अबदान (दोघेही रा महावीर चौक रुई जि. कोल्हापूर) यांना अटक केली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली