आदिती सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळालेल्या आदिती तटकरे यांनी अल्पावधित राजकारणात आपली पकड मजबुत केली आहे. कोकण विभागाच्या युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटक पदाची जबाबदारी असो अथवा रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलण्याचे काम त्यांनी केले आहे. वयाच्या २९ व्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारम्य़ा त्या सर्वात लहान महिला ठरल्या आहे. अल्पावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून कामाचा ठसा उमटवला आहे.

महाविद्यलयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर २००८ साली आदिती तटकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. श्रीवर्धन मतदारसंघातील दोन तालुक्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. हिबाब लक्षात घेऊन त्यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण संघटकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १० वर्ष संघटना बांधणीत योगदान दिल्यानंतर २०१७ साली त्यांना वरसे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणूकीतील विजयानंतर लक्षवेधी विजयानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागली. दहा वर्षांतील त्यांची राजकीय वाटचाल जिल्ह्यतील महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

चित्रलेखा नृपाल पाटील. शेकाप महिला आघाडी प्रमुख

शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या सून चित्रलेखा पाटील यांनीही अल्पावधीतच रायगडच्या राजकारणात स्वताचे स्थान निर्माण केले आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान महिलांसाठी प्रेरणादायी आहे. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी संघटक म्हणून त्या सध्या कार्यरत आहे. याशिवाय अलिबाग नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली आहे.   याशिवाय पिएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, पिएनपी सांस्कृतीक कला मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा चित्रलेखा पाटील यांनी समर्थपणे संभाळली आहे. अवसायनात गेलेल्या रायगड जिल्ह्यतील नाटय़चळवळीला नवी उभारणी देण्याचे काम त्या सध्या करत आहेत. एकाच वेळी शैक्षणिक, सामाजिक, कला आणि राजकारण अशा विवीध क्षेत्रात काम करण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षांत स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

स्नेहल माणिक जगताप, नगराध्यक्ष

महाड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष असणारम्य़ा स्नेहल जगताप यांनाही आपल्या वडिलांचा राजकीय वारसा लाभला आहे. महाविद्यलयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिक जगताप यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी संभाळली. यानंतर महाड नगर पालिकेसाठी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत त्या विRमी मतांनी निवडून आल्या. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांची महाडच्या नगराध्यक्षपदी वर्णी लागली.

राजकीय वारस्यातून त्यांची या पदावर नियुक्ती झाली असली तरी अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामातून स्वताची ओळख निर्माण केली. महाड शहरवासीयांसाठी अपघात विमा आणि आरोग्य विमा राबविण्याचा अभिनव राबविले. हत्या रोखण्यासाठी जिजाऊ कन्या योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजुर करून घेतला. चवदार तळे, रमाबाई विहाराच्या सुशोभिकरणाचे काम मंजुर करून घेतले. डंपिंग ग्रांऊडचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या या कार्यप्रणाली मुळे रायगड जिल्ह्यतील राजकारणात स्वताची वेगळ स्थान निर्माण केले. या तिघीही तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षात सध्या कार्यरत आहे. तिघींच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत.मात्र तिघींनीही आपल्या कर्तृत्वाने रायगड जिल्ह्यतील राजकारणावर छाप सोडली आहे. आगामी काळात जिल्ह्यच्या राजकारणात तिघींचे योगदान महत्वाच ठरेल यात शंका नाही.