राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी करण्यात आली असली तरी शिवसेनेतील फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयानंतरच विस्तार केला जाईल, असे उच्चपदस्थ सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयातील शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट खटल्यातील निकालाच्या प्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार लांबत असल्याचं चित्र पहायला मिळत असतानाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असणाऱ्या मंत्रिमंडळाला ‘जम्बो मंत्रीमंडळ’ असं म्हणत टोला लगावलाय.

नक्की पाहा >> Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन

फडणवीस दिल्लीला गेले आहेत. शुक्रवारी मंत्रीमंडळ विस्तार होणं अपेक्षित होतं. मात्र आता मंत्रीमंडळ विस्तार लांबताना दिसतोय, असं म्हणत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आदित्य यांनी, “हे मंत्रीमंडळ बेकायदेशीर आहे. खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न लोकांना पडलाय,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. “या जम्बो कॅबिनेटचं लक्ष पूर्णपणे राजकारणावर आहे, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर नाहीय,” असंही आदित्य म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा संदर्भ देत आदित्य यांनी, “अशा वातावरणामध्ये म्हणजेच विषय न्यायप्रविष्ट असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो का हा प्रश्न आहेच,” असंही म्हटलं.

नक्की वाचा >> Shinde VS Thackeray: “असे गट कुठेही सरकारं बनवायला लागले तर…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

मंत्रिमंडळ विस्ताराचसंदर्भातील गोंधळ काय?

राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत अनिश्चितता कायम असून आज, शुक्रवारी विस्तार होण्याची शक्यता नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेले काही दिवस भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून वेगवेगळय़ा तारखा सांगितल्या जात आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवापर्यंत विस्तार होईल, असे सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १५ ऑगस्टपूर्वी विस्तार होईल, असा दावा केला होता.

नक्की वाचा >> Shinde VS Thackeray: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची भेट; ‘नंदनवन’ निवासस्थानी रात्री झालेली भेट चर्चेत

उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिवसभराचे नियोजित कार्यक्रम रद्द करून गुरुवारी तातडीने नवी दिल्लीत गेल्याने विस्ताराची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे दिवसभराचे सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे आजही मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> “ज्या माणसाने नगरविकास मंत्री असताना हा निर्णय घेतला त्यानेच बेकायदेशीर मुख्यमंत्री म्हणून…”; खरा मुख्यमंत्री कोण? म्हणत आदित्य यांची टीका

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीत निर्णय होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी राजभवनवर ठेवण्यात आली. त्यासाठी सर्व यंत्रणा गुरुवारी कार्यरत होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. पण न्यायालयाने पुन्हा सोमवारी सुनावणी ठेवली असून त्यावेळी अंतरिम आदेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींकडून विस्ताराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नक्की वाचा >> “बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं…”; शिंदे सरकारच्या बैठकीसंदर्भातील स्वत:च्याच विधानावर अजित पवारांना हसू अनावर

विस्तार सोमवारनंतरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेले महिनाभर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. शासकीय यंत्रणांनी तशी तयारीही केली होती. पण विस्तार शुक्रवारी होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील फुटीवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यानंतरच विस्तार होण्याचे आता जवळजवळ पक्के होत आहे.