एकनात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनाम द्यावा लागला. बंडखोरी केलेले आमदार आपल्या या निर्णयाचे वेगवेगळे कारण देतात. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते आगामी निवडणुकीत बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे म्हणताना दिसतात. दरम्यान, ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करत आगामी निवडणुकीत आमचे १४० आमदार निवडून येणार, असा दावा केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा >>> जयंत पाटलांकडून एकनाथ शिंदेंचे तोंडभरून कौतूक, जाहीर मुलाखतीत म्हणाले; “ते…”

म्हणूनच मला सतत वाटते की…

“आम्ही नक्की काय चूक केली? त्यांची काहीतरी अडचण असेल. ते सुरतेला पळून गेले. गुवाहाटीला गेले. नंतर गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा बंडखोर आमदार टेबलावर चढून हातवारे करून नाचले. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. म्हणूनच मला सतत वाटते की चाळीस गेले चालेल. आम्ही शून्यावर जरी गेलो तरी पुढच्या निवडणुकीत १४० जागा जिंकून दाखावू. ती ताकद आमच्यात आहे,” असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “मला…”

पक्षाला फोडणे किती योग्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला बंडखोरी केलेल्या ४० आमदारांपैकी एकाचा मेसेज आला की आम्हाला गद्दार नका म्हणून तर विश्वासघातकी म्हणा. आम्ही त्यांना सर्वकाही दिलं. सामाजिक, राजकीय ओळख दिली. सर्व महत्त्वाची खाती दिली. पक्षाला फोडणे किती योग्य आहे. पक्ष फोडून परिवार संपवणे किती योग्य आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.