संगमनेर : शहरातील बेकायदा कत्तलखान्यांबद्दल आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत लक्षवेधी केल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी बेकायदा कत्तलखान्यांवर धाडी टाकल्या. यातील एका आरोपीवर आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाई झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार पसारच आहे.पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मदिनानगर येथील कत्तलखान्यावर छापा टाकला.

सहा आरोपींवर गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली. सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे गोमांस, अवयव, विनाक्रमांकाची रिक्षा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोफियान नासिर कुरेशी, सोनू उर्फ आतिक रफिक कुरेशी व सालेम रियाज कुरेशी हे तिघे फरार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आज पहाटे पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस नाईक राहुल डोके, हवालदार खेडकर यांनी जमजम कॉलनी परिसरातील कमर अली गुलाम जिलानी सौदागर याच्या वाड्यावर छापा टाकून दीड लाख किमतीचे गोमांस, अवयव, कुऱ्हाड आदी जप्त केले. हवालदार राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कमरली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आरोपीविरुद्ध गेल्या आठवड्यातही पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यावेळी कत्तलीच्या उद्देशाने डांबलेली दोन लाख रुपये किमतीची जनावरे सोडवली गेली होती.