अहिल्यानगर : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा शिक्षक पुरस्कार्थींची नावे जाहीर केली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले होते. आता या तिन्ही वर्षांच्या पुरस्काराचे शुक्रवारी (दि. ५) पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात वितरित केले जाणार आहेत.
सन २०२४- २०२५ चे पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे –
अनिल डगळे (शिळवंडी, अकोले), कैलास भागवत (वडगावपान, संगमनेर), मंगला गोपाळे (शिंदेवस्ती नवीन, कोपरगाव), मंगल भडांगे (गोर्डे वस्ती, राहाता), सुजित बनकर (खिर्डी, श्रीरामपूर), जयश्री झरेकर (खुडसरगाव, राहुरी), रूपाली खेडकर (गोमळवाडी, नेवासा), विठ्ठल देशमुख (मढी, पाथर्डी), खंडेराव सोळंके (सारोळा, जामखेड), आबा सूर्यवंशी (पवारवाडी, कर्जत), नवनाथ वाळके (ढगेवाडी-चांबुर्डी, श्रीगोंदा), सचिन खांडगे (धोत्रे, पारनेर), वर्षा कासार (बाबुर्डी घुमट, नगर), केंद्रप्रमुख – विजय भांगरे (खिरवीरे, अकोले) व रामदास बाबागोसावी (हिंगणगाव, नगर).
सन २०२३-२४ चे पुरस्कार्थी –
पुष्पा लांडे (शिळवंडी, अकोले), संजय कडलक (सावरगाव तळ, संगमनेर), पितांबर पाटील (दशरथवाडी- संवत्सर, कोपरगाव), ललिता पवार (गमेगोठा केलवड, राहाता), योगेश राणे (शिरसगाव, श्रीरामपूर), सुनील लोंढे (उंबरे, राहुरी), सुनील अडसूळ (सोनवणेवस्ती, नेवासे), गोरक्षनाथ बर्डे (कऱ्हेटाकळी, शेवगाव), नामदेव घायतडक (सोमठाणे नलावडे, पाथर्डी), बाळू जरांडे (पवारवस्ती पाडळी, जामखेड), दीपक करंजकर (मिरजगाव, कर्जत), स्वाती काळे (पवारवाडी, अजनूज, श्रीगोंदे), प्रकाश नांगरे (शोभलेवाडी, पारनेर) व वर्षा कचरे (शिंगवे नाईक, नगर), केंद्रप्रमुख – ज्ञानेश्वर जाधव (दहिगावने, शेवगाव).
सन २०२२-२३ चे पुरस्कार्थी –
नरेंद्र राठोड (तीर्थाची वाडी, अकोले), सोमनाथ घुले (पिंपळगाव माथा, संगमनेर), सचिन अडांगळे (बहादरपूर, कोपरगाव), भारती देशमुख (खर्डे पाटोळे, राहाता), सविता साळुंखे (गोंडेगाव, श्रीरामपूर), अनिल कोल्हापुरे (पिंपरी अवघड, राहुरी), सुनीता निकम (भालगाव, नेवासा), अंजली चव्हाण (बोधेगाव, शेवगाव), भागिनाथ बडे (सोमठाणे नलवडे, पाथर्डी), एकनाथ चव्हाण (वसरवाडी, जामखेड), किरण मुळे (बर्गेवाडी, कर्जत), जावीद सय्यद (मढेवडगाव, श्रीगोंदा), विजय गुंजाळ (सांगवी सूर्या, पारनेर), साधना क्षीरसागर (कवडगाव, नगर). केंद्रप्रमुख – रावजी केसकर (पारनेर, मुले), अशोक विटनोर (उक्कलगाव, श्रीरामपूर).
पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांची स्वयंमूल्यमापनाद्वारे लेखी परीक्षा घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीमार्फत नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.