कोल्हापूरमध्ये एका प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (३ जानेवारी) उघडकीस आला. राहुल विश्वास मच्छे आणि प्रियंका विकास भराडे अशी आत्महत्याग्रस्तांची नावे आहेत. ते दोघे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राहुल मच्छे (वय २५) व प्रियांका भराडे (वय २२) हे तामसवाडी (ता. नेवासा) या गावातील रहिवासी आहेत. प्रियंका हिचा गावातील एका तरुणाशी ३ वर्षापूर्वी विवाह झाला होता. प्रियंका-राहुल यांचे प्रेम जडले होते. ते दोघे सरत्या वर्षाच्या सायंकाळी कोल्हापुरात आले. महालक्ष्मी मंदिरा जवळील एका यात्री निवासात त्यांनी मुक्काम केला.

पंख्याला गळफास लावून प्रेमीयुगलाची आत्महत्या

दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत या प्रेमीयुगलाने दरवाजाच उघडला नाही. त्यामुळे यात्रीनिवास मालकाला शंका आली. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता प्रेमीयुगुलाने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचे प्रेम कोणाला कळलेच नाही”

पोलिसांना घटनास्थळी प्रियंकाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये ‘आम्ही प्रेम करत होतो, पण ते कोणाला कळले नाही. दोघे एकत्र येऊ शकलो नाही, तरी मरू शकतो’, असं लिहिलं आहे.