अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार शरद पवार आणि मला संपर्क करत आहे. आमदारांना धोक्याने नेल्याचं सांगितलं. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली, ते वगळता सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू. एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

“येत्या ५ जुलै रोजी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल,” अशी खात्री व्यक्त करतानाच, “शरद पवार यांच्याबरोबर असणारा आणि पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी होईल,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “भाजपाचं हिंदुत्व बेगडी, आम्ही…”, अमोल मिटकरींचा हल्लाबोल, ‘आरएसएस’लाही केलं लक्ष्य

“आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले, तर सर्वजण अद्याप आमच्याबरोबर आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल,” असेही जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : “वसंतदादा तुम्ही आज असायला पाहिजे होता, देवेंद्रजींनी…”, सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली, त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील,” अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.