सांगली : वडील इलियास नायकवडी यांना शरद पवार यांनी आमदार करण्याचे आश्वासन २५ वर्षांपूर्वी दिले होते. उधारीवर दिलेले हे आश्वासन प्रत्यक्ष पाळले आमचे नेते अजित पवार यांनी, अशा शब्दांत इद्रिस नायकवडी यांनी आपल्या निवडीवर आजवरच्या उपेक्षेबाबत पवारांना चिमटा काढत अजित पवार यांचे कौतुक केले.

विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथविधी झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी मिरजेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष जमिल बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी हेही उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आपणास विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली. संपूर्ण सभागृहात आता केवळ आपण एकमेव अल्पसंख्याक सदस्य असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. वडील इलियास नायकवडी यांना शरद पवार यांनी आमदार करण्याचा शब्द २५ वर्षांपूर्वी दिला होता. परंतु हे केवळ आश्वासनच राहिले. पवारांनी उधारीवर दिलेला हा शब्द आमचे नेते अजित पवार यांनी पाळला.

हेही वाचा : “शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेलं बक्षीस अद्यापही दिलं नाही”; जितेंद्र आव्हाडांचा दावा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खा. राऊत यांनी आपणावर आरोप करत असताना त्याची खातरजमा करण्याची तसदी घ्यायला हवी होती. वंदे मातरम या गीताबाबत जो वाद झाला होता, त्यामध्ये मी नव्हतो. परंतु वाद अधिक वाढू नये यासाठी लोकांना एकत्र करून सामूहिकपणे वंदे मातरमचे गायन केले होते. याची माहिती खा.राऊत यांना मिळालेली नाही. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात माझे नाव गोवण्यात आले होते. न्यायालयाने या खटल्यातून माझी निर्दोष मुक्तता केली आहे. मी केवळ मुस्लिम समाजाचे नेतृत्वच करतो असे नाही, तर मिरजेत येऊन पाहावे, मी हिंदू मंदिरही स्वखर्चाने बांधून दिले आहे. याचीही खा. राऊत यांनी माहिती घ्यावी.