वाई: प्रशासकीय कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसेल तर संबंधितांनी तात्काळ संपर्क करुन याबाबतची माहिती दिली पाहिजे. कामात अडचण काय ते सांगता येत नाही का? राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे सुरू आहेत. तुम्ही कारणं सांगू नका, माझ्या गतीनं कामं करा असे सांगत उपमुख्यमंत्री  अजित पवार साताऱ्यात अधिकाऱ्यांवर संतापले.साताऱ्यातील सर्व कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सातारा शहरात वैद्यकीय महाविद्यालय , सैनिक स्कूलचे नूतनीकरण आणि अन्य  प्रशासकीय कामांना निधी वेळेत मिळत नसल्याने कामे रखडत चालली आहेत. याबाबतची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.त्यांच्याशी  चर्चा केली.अडचणी जाणून घेतल्या. सातारा शहरातील वैद्यकीय महाविद्यालय , सैनिक स्कूलचे नूतनीकरण शासकीय विश्रामगृहाचे काम व अन्य कामेनिधी अभावी थांबवू नयेत,.वैद्यकीय महाविद्यालयाचे काम  कोणामुळे थांबले आहे. वित्त विभागामुळे की, वैद्यकीय शिक्षण विभागामुळे याची माहिती घेतली. त्याचबरोबर सैनिक स्कूलचे काम तसेच शासकीय विश्रामगृहाचे कामही सुरु आहे.निधीबाबात काही अडचणी असतील तर त्याचवेळी संबंधित कामाबाबत चर्चा करत चला असे अधिकाऱ्यांशी बोलत काही सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा >>>सदनिकांचा आकार वाढतोय! तुमच्या शहरातील घरांचा सरासरी आकार जाणून घ्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार  रविवारी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त साताऱ्यात आले होते.शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी येथील कामांचा आढावा घेतला.कामे थांबली असल्याचे समजताच यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. कामात अडचण काय ते सांगता येत नाही का असे सांगत पवार यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले.यानंतर ते प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.यावेळी आमदार मकरंद पाटील, नितीन भरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर, अमित कदम, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होतेे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचवेळी कराड येथील भाजपचे नेते व माजी आमदार आनंदराव पाटील आले.  दोघांच्यामध्ये सुमारे एक तास कमराबंद चर्चा झाली. त्यानंतर पुढे पाटणला जाण्यासाठी अजित पवार यांच्याच गाडीत मागील सीटवर बसून आनंदराव पाटील पाटणला गेले.