राजकीय विरोधक म्हणजे शत्रू नव्हेत. एकमेकांवर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा होतच असते, असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पार्थ पवार आणि शंभूराजे देसाई यांच्या भेटीचे अप्रत्यक्ष समर्थन केले.

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अंजनी (ता. तासगाव) येथील स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पार्थ आणि मंत्री देसाई यांच्या भेटीबाबत विचारणा केली असता, थेट उत्तर न देता पवार यांनी, मी मंत्री असताना अनेक राजकीय नेत्यांशी भेटत होते, अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामांबाबत चर्चाही केली जाते. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी राजकीय शत्रुत्तव नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार एकमेकांबद्दल टीकात्मक भाषण करायचे, पण एकत्र भेटल्यावर मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे.

हेही वाचा – पुणे : शरद पवार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या एकाच व्यासपीठावर?

हेही वाचा – “शिंदे गटाने सुरू केलेला पक्षाविषयीचा वाद म्हणजे देशाच्या संसदीय रचनेची थट्टा” कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम हा मुंबई महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून झाला असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी आबांच्या स्मृतीस्थळी संरक्षण भिंत उभारण्यात आली असून, या ठिकाणी झाडे लावण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.