अलिबाग : स्‍वस्‍तात सोनं देतो सांगून दोघा सराफांची लुटून नेलेली रक्‍कम रायगड पोलीसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने हस्‍तगत केली आहे. लुटलेल्‍या दीड कोटी रूपयांपैकी १ कोटी ४९ लाख ८३ हजार हस्तगत करण्यात आले आहेत. ही रक्कम लपवुन ठेवण्‍यास मदत करणारे विशाल पिंजारी व अक्षय खोत यांना पोलीसांनी अटक केली आहे. दरम्‍यान या गुन्‍हयातील आरोपी शंकर कुळे व पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी हे अद्यापही फरार आहेत.

समाधान पिंजारी याने त्‍याच्‍या गावातील सराफ नामदेव हुलगे याला स्‍वस्‍तात सोनं देण्‍याचे आमिष दाखवले नामदेव हुलगे व त्‍याच्‍या ओळखीचा कामोठे येथील एक सराफ ओमकार वाक्षे यांनी त्‍यासाठी दीड कोटी रूपये जमवले. समाधान पिंजारी हा त्‍यांला घेवून अलिबागकडे आला. तिनविरा धरणाजवळ दोघा पोलीस कर्मचारयांचया मदतीने पोलीस आल्‍याचा बहाणा करून त्‍यांची दीड कोटींची रक्‍कम लंपास केली. त्‍यानंतर हनुमंत सुर्यवंशी याने या सराफांना फोन करून दमदाटी केली व दोन कोटी रूपये द्या नाहीतर तुमच्‍यावर गुन्‍हा दाखल करतो असे धमकावले.

याप्रकरणी पोयनाड पोलीसात तक्रार दाखल झाल्‍यानंतर पोलीसांनी समाधान पिंजारी त्‍याचा सहकारी दीप गायकवाड, पोलीस अंमलदा रसमीर म्‍हात्रे आणि विकी साबळे यांना अटक केली. पळवून नेलेली रक्‍कम आरोपींनी सांगली जिल्‍हयातील आटपाडी येथे लपवून ठेवली होती. पोलीसांनी मोठया शिताफीने ही रक्‍कम हस्‍तगत केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरोडयातील रक्‍कम दिप गायकवाड यांचया घरी ठेवली होती. त्यानंतर समाधान पिंजारी याने त्याचा चुलत भाउ नामे विशाल पिंजारी व अक्षय खोत यांना अक्षय खोत याची कार घेवून अलिबागला बोलावले. दिप गायकवाडच्या घरी ठेवलेली सर्व रक्कम सुटकेसमध्ये ठेवली. ही रक्कम विशाल पिंजारी व अक्षय खोत यांच्‍या ताब्यात दिली. दोघांनी ही रक्‍कम सांगलीतील आटपाडी येथे नेवून लपवून ठेवली होती. आता या गुन्‍हयातील अटक आरोपींची संख्‍या सहा झाली असून दोन अद्यापही फरार असल्‍याचे पोलीसांनी सांगितले.