राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अमित शाह हे प्रभावशाली नेते असल्याचं विधान कोल्हे यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं असून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज केंद्रात सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. सीबीएससीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तर नाही, अशी खंत आपण व्यक्त करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजाचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर अजूनही महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही, शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवावा अशी मागणी मी संसदेत केली आहे.

हेही वाचा- “होय, त्याला फोन केला, पण…” चेंबुरच्या व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

अशा मागण्या किंवा खंत आपण जेव्हा व्यक्त करत असतो. तेव्हा या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्याचं पाठबळ आवश्यक असतं. अशा नेत्यांच्या पाठबळामुळे मागण्या पूर्ण होण्यास मदत होऊ शकते, असं विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

हेही वाचा- “आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा नवीन चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेटही घेतली आहे. दरम्यान, त्यांनी अमित शाहांवर स्तुतीसुमनं उधळल्याने चर्चांना उधाण आलं आहे.