Mitali Thackeray on Mahim Constituency : निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावण्यास आता ४८ तासांहून कमी काळ उरला आहे. येत्या काही तासांत प्रचारांना जोर येऊन सभाही वादळी ठरणार आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्या करता उमेदवार आणि स्टार प्रचारक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. फक्त उमेदवारच नाहीत, तर त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंबीयही प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरेंनीही पहिल्या दिवसापासून अमित ठाकरेंची साथ दिली आहे. त्यानिमित्ताने आज त्यांना प्रचारादरम्यान महिलांच्या समस्यांबद्दल अनेक गोष्टी कळल्या. याबाबत त्यांनी लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मिताली ठाकरे त्यांच्याबरोबर आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यापासून ते प्रचारसभा घेण्यापर्यंत मिताली ठाकरे सातत्याने अमित ठाकरेंबरोबर दिसल्या आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघ तर त्यांनी पिंजून काढला. याबाबत त्या म्हणाल्या, “या एवढ्या दिवसांत मी किती घरांत भेट दिली असेल, किती लोकांना भेटले असेन हे आता मला आठवतही नाही. भेटल्यावर ते आमचं स्वागत करायचे. आमचं औक्षण करायचे, खायला द्यायचे.”

हेही वाचा > Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!

महिला माझ्याशी कनेक्ट झाल्या

“त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण दिलखुलास बोलू शकतो असं वाटायचं. ज्या गोष्टी अमितशी बोलता येत नव्हत्या त्या माझ्याशी शेअर केल्या गेल्या. एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे मी महिलांकडे जास्त कनेक्ट झाले. तेही माझ्याकडे जास्त कनेक्ट झाले. महिलांच्या शौचालयाची एक तीव्र समस्या यामुळे समजली. आपल्याकडे पुरेसे सार्वजनिक शौचलये नाही आहेत. असले तरीही त्याची स्वच्छता राखलेली नसते. हा माझाही अनुभव आहे. आता आम्ही ९० टक्के वेळ घराबाहेर असतो. मी पाणी पिऊन हायड्रेट करू स्वतःला की काय करू, हेच समजत नव्हतं”, असं मिताली ठाकरे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित ठाकरेंचा काय अनुभव?

“मला शौचालयाला जायचं होतं. घरी जाण्यापेक्षा मी सार्वजनिक शौचालयात जाण्याचा विचार केला. तिथे गेल्यावर मला दिसलं की तिथे पाच सहा दारूच्या बाटल्या होत्या संपलेल्या. मी विचार केला की दारू प्यायल्याशिवाय येथे येऊच शकत नाही”, असा अनुभव अमित ठाकरे यांनी सांगितला.