शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “मंत्रीमंडळातील ज्या महान मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, ते बघता देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्याच भविष्यवाणीला तिलांजली दिली आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार झाला. या विस्तारात मंगलप्रभात लोढा, तानाजी सावंतक आणि इतर १८ अशा महान मंत्र्यांनी शपथ घेतली. हे सरकार किती काळ टिकेल काळच ठरवेन. मात्र, काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहे, त्यांना मंत्रिमंडळात स्थान नसेल अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तुर्तास त्या भविष्यवाणीला तिलांजली मिळाली आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच हिंदुत्वासाठी सर्वस्व त्याग करून एकत्र आलेल्या या मंत्रीमंडळाला शुभेच्छा देताना एवढचं म्हणेल, ‘काय ते मंत्री, काय ते मंत्रीमंडळ अन् काय ते हिंदुत्व’”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले”; नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काल मंत्रीमंडळ विस्तारानंतरही अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. “हिंदुत्वासाठी औट घटकेचं ओढूनतोडून स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील प्रथम श्रेणी कॅबिनेट मंत्र्यांना कट्टर धर्म रक्षणाच्या शुभेच्छा,” असे मिटकरींनी म्हटले होते. त्याचप्रमाणे याच ट्विटमध्ये त्यांनी, “ज्यांना यात स्थान मिळालं नाही त्यांनी त्यांचे खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेले आहेत असे समजावे,” असा खोचक टोला लगावला होता.