राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टिव्ह असतात. त्यांची गाणी आणि त्यांचे ट्वीट्स हे सोशल मीडियावर नेटिझन्समध्ये प्रचंड व्हायरल होतात. म्हणूनच सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चा असते. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी केलेलं एक नवीन ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी स्वत:चा एक फोटो शेअर केला असून त्यावर एक क्रिएटिव्ह कॅप्शन देखील दिली आहे. या कॅप्शनमधील मजकुरामुळे हे ट्वीट चर्चेत आलं असून त्यावर अनेक नेटिझन्स वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देखील देऊ लागले आहेत.

काय आहे ट्वीटमध्ये?

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक योगासन करताना त्या दिसत आहेत. हिरवळीवर योगासन करतानाचा त्याचा हा फोटो व्हायरल होऊ लागला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेली ओळ देखील चर्चेत आहे. “जगाची चुकीची बाजू वर आहे. ते उलट्याबाजूने फिरवण्याची गरज आहे. असं केल्यास जगाची योग्य बाजू वर येईल”, अशा आशयाचं इंग्रजी भाषेतून ट्वीट त्यांनी केलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर काही नेटिझन्सनी त्यांचे योगासन करतानाचे फोटो किंवा व्हिडीओ ट्वीट केले आहेत.

तर काहींनी आपण असं आसंन करूच शकत नाही, असं देखील म्हटलं आहे.

नुकतंच अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं रिलीज झालं होतं. गणपतीच्या मुहूर्तावर त्यांनी हे गाणं रिलीज केलं होतं. एकूण ४ मिनिटे ४९ सेकंदांच्या या गाण्यामध्ये त्यांनी एका कुटुंबवत्सल स्त्रीची भूमिका साकारली आहे. ‘गणेश वंदना’ असं या अल्बमचं नाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीही अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी रेकॉर्ड केली असून ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत.