अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. पंधराव्या फेरीअखेर लटकेंना ५५ हजार ९४६ मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नोटाला १० हजार ९०६ मतं मिळाली आहेत. ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित होत असताना त्यांचे सासरे व दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतुजा लटके यांनी आपल्या पतीप्रमाणे जनतेची कामं करावीत, त्या नक्की जिंकतील, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया कोदिंराम लटके यांनी दिली. यावेळी त्यांनी आपल्या सुनेला मोलाचा सल्लाही दिला आहे.

रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके म्हणाले की, जनतेनं विश्वास ठेवल्याने ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. त्या नक्की जिंकून येतील, अशी मला आशा आहे. आपल्या पतीने केलेल्या कामाप्रमाणे त्यांनीही जनतेची कामं व्यवस्थितपणे करावीत. जनतेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. त्यांनी लोकांच्या घरी जाऊन मदत करावी, लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. कुणी आजारी असेल तर त्यांना रुग्णालयात जाऊन धीर द्यावा, असा सल्ला त्यांनी आपल्या सुनेला दिला आहे.

हेही वाचा- Andheri Bypoll: सून अर्ज भरायला गेल्यानंतर रमेश लटकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, भावुक होत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रमेश लटकेंनी लोकांसाठी कामं केल्याने त्यांनी ऋतुजा लटके यांच्यावरही विश्वास टाकला आहे. त्यांनीही लोकांचा विश्वास सार्थ ठरवावा आणि लोकांची कामं करावीत” असंही ते पुढे म्हणाले.