Anil Parab on Shivsena UBT – MNS Raj Thackeray Alliance : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोन्ही बाजूचे नेते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, अलीकडेच दोन्ही पक्षांचे प्रमुख (राज व उद्धव ठाकरे) परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे ही चर्चा काही दिवस रखडली होती. अखेर, आता दोन्ही नेते मुंबईत दाखल झाले असून आता युती होणार की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा पुढे येऊ लागला आहे. यावर शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे की “शिवसेना (उबाठा) पक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही राज ठाकरे यांना तसा प्रतिसाद दिला आहे. आता राज ठाकरे पुढचा निर्णय घेतील.
आम्ही मनसेबरोबरच्या युतीसाठी सकारात्मक असून आम्ही तसा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी ठरवाचं आहे की कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती करायची नाही. त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा”, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
आता राज ठाकरे यांनी निर्णय घ्यायचा आहे : परब
शिवसेना (ठाकरे) व मनसेच्या युतीच्या चर्चेदरम्यान, राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. शिवसेनेची (शिंदे) व मनसेची युती व्हावी यासाठी शिंदे गटातील नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. यावर अनिल परब म्हणाले, “कोणाशी युती करायची हे मनसेच्या प्रमुखांनी ठरवायचं आहे. राज ठाकरे यांनी युतीचा निर्णय घ्यायचा आहे”.
राज ठाकरे म्हणाले, “राज ठाकरे यांना वाटलं की शिवसेनेबरोबर (ठाकरे) युती झाली पाहिजे. त्यानंतर आम्ही देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. आता राज ठाकरे यांनी युतीबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. कोणाशी युती करायची आणि कोणाशी नाही हे त्यांनी ठरवावं. आम्हाला वाटलं की राज ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी बोलले आणि आम्ही देखील त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करावी, भाजपाबरोबर युती करावी आणि त्यातून राज्याचं हित साधलं जाईल असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तसा निर्णय घ्यावा. तो त्यांचा प्रश्न आहे”.