संगमनेर : भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रवरा, आढळा व म्हाळुंकी नद्यांना पूर आले असून, प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने पूजन करत आरती केली.

गंगामाई घाट येथे प्रवरा नदीचे जल पूजन व आरती करण्यात आली. याचबरोबर म्हाळुंगी नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, अजित काकडे, प्रमिला अभंग, मुन्ना कडलक, चंद्रकांत कडलक, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, सुमित पवार, आदित्य बर्गे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीतून आणि कालव्यातून पाणी येत असल्याने आता समृद्धी वाढली आहे. निळवंडे व भंडारदरा मिळून आता २० टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. या पाण्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाला आहे. नदी सर्वांना सामावून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, प्रत्येक विभागाची संस्कृती कवेत घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते. संगमनेरची ही संस्कृती एकतेची समानतेची आहे. आई म्हणून नदीची ओळख असून, मोठ्या आनंदाने दरवर्षी आपण तिचे पूजन करत असतो.
भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रवरा, आढळा व म्हाळुंकी नद्यांना पूर आले असून, प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे.