आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासंदर्भातील सविस्तर माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली असून मुख्यमंत्री शनिवारी रात्री पंढरपूरला रावाना होणार आहेत.

नक्की पाहा >> Photos : यंदाच्या आषाढी पूजेचा मान एकनाथ शिंदेंना; महापूजेचे आमंत्रण घेऊन घरी आले विशेष पाहुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून कारने मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबियांसोबत पंढरपूरकडे रवाना होतील. पंढरपूर येथे रात्री साडेअकरा वाजता मुख्यमंत्र्याचं आगमन होईल. त्यानंतर शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री उपस्थित राहतील. रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहतील. पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल.

पहाटे पवाणेसहा वाजता नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित असतील असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सकाळी पावणेबारा वाजता मुख्यमंत्री पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ समारोपामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.

दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री कारने सोलापूर विमानतळाकडे रवाना होतील व तेथून शासकीय विमानाने मुंबईत दाखल होतील. सायंकाळी साडेचार वाजता मुंबई विमानतळ येथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. त्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानासाठी रवाना होतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi 2022 eknath shinde will attend maha aarti as chief minister check his full schedule scsg
First published on: 08-07-2022 at 20:40 IST