राष्ट्र्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार का? असा सवाल केला जातोय. दरम्यान याच चर्चेवर भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. खडसे यांच्या प्रवेशाबाबत अमित शाह जो निर्णय घेतील तो भाजपाचा निर्णय असेल, असे शेलार म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> “…तेव्हा अजित पवारांना खरा धक्का बसेल”, मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा; ‘गद्दार’ शब्दावरूनही टोला!

एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाच्या ऐकीव बातम्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आवश्यकता आणि नियोजनानुसार एकनाथ खडसे यांना वेळ दिली असेल, तर मी त्यावर काय भाष्य करणार? एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशावर अमित शाह निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा भाजपाचा निर्णय असेल, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

हेही वाचा >>>दसरा मेळाव्यासंदर्भात शिंदे गट महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत; सुहास कांदे यांनी दिली माहिती, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चर्चेवर खुद्द एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. अमित शाह यांची भेट घेतल्याचं वृत्त खरं असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. पण असं बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. “अमित शाहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्रजींनाही भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शाहांना भेटू नये असा नियम आहे का? हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत,” असे स्पष्टीकरण यापूर्वी खडसे यांनी दिले आहे.