शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई महापालिका निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे. हे सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. त्यांनी १५० जागा जिंकण्याची भाषा केली आहे, पण आम्ही त्यांना ६० च्या आत आऊट करू. याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. कोटक यांच्यापाठोपाठ आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील सारखंच वक्तव्य केलं आहे.

भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिकेत जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा या निवडणुकीत आम्ही १५१ जागा जिंकू. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपाइंसह एनडीए १५१ जागा जिंकेल आणि मुंबईत भाजपाचा महापौर बसेल. आपली सत्ता आणण्यासाठी तुम्ही सगळी ताकद लावा अशी विनंती आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केली. शिवसेनेच्या ठाकरे गटाबद्दल आशिष शेलार म्हणाले, मुंबईकरांनी यांना नाकारलंय, झिडकारलंय, मुंबईकरांनी त्यांना आपलं म्हणणं टाळलंय. भाजपाचं मुंबईत मिशन १५० आहे, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे.

हे ही वाचा >> “माथाडी चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, शरद पवारांचा नेमका रोख कोणाकडे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेबद्दल केलेल्या दाव्यानंतर यावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंत्री उदय सामंत याबाबत म्हणाले, असे निर्णय मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. दोघे मिळून मुबईचा महापौर कोण ठरणार केवळ याचाच निर्णय नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या महापालिकांच्या महापौरपदाचा निर्णय घेतील. यावर मी बोलून उपयोग नाही. शिंदे आणि फडणवीस परिपूर्ण राजकारणी आहेत. दोन्ही पक्ष परिपक्व आहेत आणि हे दोन्ही नेते वायफळ बोलत नाहीत. मी साताऱ्यात जर सांगितलं की आम्हाला २८८ जागा लढवायच्या आहेत, तर ते वाक्य म्हणजे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेत्यांने केलेलं वक्तव्य असतं.