या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्य़ातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चच्रेत आला आहे. खालापूर तालुक्यातील डोलवली येथील आदिवासी आश्रमशाळेत शुक्रवारी ११ वर्षांची मुलगी अंथरुणात मृतावस्थेत आढळून आली होती. यमुना वासुदेव खोडके हिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आश्रमशाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यमुनाचा जीव गेल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. रायगड जिल्ह्य़ात आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भालीवाडी मुलींच्या आश्रमशाळेत अशीच घटना घडली होती. रसायनी आणि नागोठणे येथे अशा घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर आश्रमशाळेतील मुला-मुलींचे लंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना जिल्ह्य़ात समोर आल्या आहेत. त्यामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

गेल्या वर्षी रसायनीजवळील चांभार्ली येथील शांती अनाथालय आश्रमातील ८ अल्पवयीन मुलींचे लंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी संस्थाचालक महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक करण्यात आली आहे.

पनवेल येथील कल्याणी महिला व बाल सेवा संस्थेच्या आश्रमशाळेत पाच मतिमंद मुलींचे लंगिक शोषण झाल्याची बाब २०१० मध्ये उघडकीस आली. संस्थाचालक रामचंद्र करंजुले आणि त्याच्या साथीदांरीनी या मतिमंद मुलींचे शोषण केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात न्यायालयाने रामचंद्र करंजुले याला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली.

कर्जत  तालुक्यात २०१४ मध्ये चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या खासगी आश्रमशाळेत मुले आणि मुलींचे लंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर संस्थाचालक अजित दाभोळकर आणि त्याच्या सहकारी ललिता तोंडे यांना अटक करण्यात आली. अल्पवयीन मुला-मुलींचे लंगिक शोषण करणे, अजाणत्या वयात त्यांना िलगपुजेसारखे अघोरी प्रकार करायला लावणे यासारखे किळसवाणे प्रकार या आश्रमशाळेत सुरू असल्याचे तपासात समोर आले.

या  सर्व घटनांचा अभ्यास केला तर आश्रमशाळा या अल्पवयीन मुली आणि मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नसल्याचे स्पष्ट होत आहे. आश्रमशाळा या लंगिक शोषणाची केंद्रे बनत चालली आहेत, हे यावरून दिसून येत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक प्रकरणांत ज्या संस्थाचालकांनी या संस्था काढून आश्रमशाळा काढल्या तेच या लंगिक शोषणाचे केंद्रस्थानी राहिल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे.

रायगड  जिल्ह्य़ात समाजकल्याण विभाग, आदिवासी कल्याण विभाग आणि खाजगी संस्थांच्या जवळपास ६० आश्रमशाळाआणि निवासी वसतीगृहे कार्यरत आहेत. यात १६ शासकीय तर ११ अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. या सर्व आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. आश्रमशाळा आणि वसतीगृहांना ठरवून दिलेल्या निकषांचे काटेकर पालन होणे गरजेचे आहे. आश्रमशाळांची तपासणी करून सुरक्षेत त्रुटी आढळल्यास संबधित आश्रमशाळा चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

अशोक  जंगले कार्यकारी संचालक दिशा केंद्र.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashram schools students security issue
First published on: 18-01-2017 at 01:43 IST