धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांचे गुरुवारी (२३ जून) रात्री अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचा आरोप एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच या विरोधात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. आमदार डॉ. फारुख शाह यांना अतिरिक्त पोलीस सुरक्षा द्या, अशीही मागणी देखील करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्या डॉ. दीपा नाईक यांनी सांगितले, “धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच त्यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. यापूर्वी आम्ही पोलीस विभागाला वेळोवेळी सूचित केले आहे. असे असताना गुरुवारी रात्री पुन्हा आमदार फारुख शहा यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.”

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार मातोश्रीवर दाखल; वाचा प्रत्येक अपडेट…

“या गंभीर गोष्टीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ आमदार फारुक शाह यांची सुरक्षा वाढवावी. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्या घराजवळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा. तसेच रात्रीच्या वेळी त्यांच्या सुरक्षेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात यावा,” अशा अनेक मागण्या एमआयएमच्या दीपा नाईक यांनी केल्या. याबाबत त्यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to kidnapping of aimim mla farukh shah threat to murder in dhule pbs
First published on: 24-06-2022 at 19:54 IST