औरंगाबादमध्ये जमावबंदी असल्याचे कोणतेही आदेश काढले नसल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यातच पोलिसांनी सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत जमावबंदी लागू केल्याची चर्चा होती. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख असल्याचं बोललं जात होतं. पण पोलीस आयुक्तांनी ही सर्व चुकीची माहिती असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी…”; राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा टीझर; उत्सुकता शिगेला

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी सांगितलं की, “ही चुकीची माहिची आहे. कलम १४४ संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रं बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. वर्षभर असे आदेश काढले जातात”.

राज ठाकरेंची सभा रद्द होणार? औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदी; पोलिसांचे आदेश

पुढे बोलताना ते म्हणाले की, “कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत. हा एक नियमित आदेश आहे”.

राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश काढल्याचा गैरसमज झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “असं काही नाही. समाजात दैनंदिन घडामोडी घडत असतात ज्यामध्ये धरणं, आंदोलन, मोर्चा यांचा सामान्यपणे १५ दिवसांनी आढावा घेतला जात असतो. हा आत्ता काढलेला आदेश नाही. वर्षभर हे सुरु असतं”. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय झालेला नाही. झाल्यावर माहिती देऊ असं स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad police commissioner nikhil gupta says no curfew orders in city mns raj thackeray rally sgy
First published on: 26-04-2022 at 12:52 IST