महायुतीत सारं काही आलबेल नाही, असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टी आणि भारतीय जनता पार्टीत संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रहारचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे सातत्याने भाजपावरील नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच मला भाजपाकडून खूप त्रास होत आहे, असंही ते सातत्याने सांगत आहेत. दरम्यान, आता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आव्हान दिलं आहे.

भाजपाकडून मला खूप त्रास होतोय, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं होतं. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत असंही आमदार कडू म्हणाले होते. बच्चू कडू यांनी यावर आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. तसेच ते म्हणाले, मी माझ्या मतदारसंघातली वस्तूस्थिती सांगितली.

अचलपूरचे आमदार बच्चू कडू अकोल्यात प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की, मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भारतीय जनता पार्टीचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही भाजपाला जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावलं पाहिजे. मैत्री न निभावता केवळ कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं, हे चुकीचं आहे. भाजपाने फक्त सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलीकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारायला हव्यात. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावायची हे उद्योग भाजपाने बंद केले पाहिजेत.

हे ही वाचा >> अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार? रोहित पवार म्हणाले, “मला दिल्लीला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर बच्चू कडू यांनी आज पुन्हा एकदा भाष्य केलं. आमदार बच्चू कडू म्हणाले, भाजपाकडून मला त्रास होतोय आणि हीच वस्तूस्थिती आहे. एकीकडे आम्हाला सांगायचं की आपण सत्तेत यायचं आहे आणि दुसरीकडे हेच लोक मित्रत्व पाळत नसतील, तर हे चुकीचं आहे. आम्हाला ज्या पद्धतीने त्रास दिला जातोय…काहीही करून बच्चू कडू त्याच्या मतदारसंघात पडला पाहिजे…चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार बोंडेंना सांगितलं तरी…मी बावनकुळेंना सांगतो, आम्हाला पाडायला असे १० खासदार अजून पाठवा, तरी बच्चू कडू पडणार नाही.