बडनेराचे आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यावरुन आमदार बच्चू कडूंवर खोचक टीका केली आहे. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही” असं म्हणत राणा यांनी बच्चू कडूंना चिमटा काढला आहे. “ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपैया” असा टोलाही राणा यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमादरम्यान लगावला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भाचाही विकास केला. त्यामुळे मी त्यांच्या सोबत उभा असल्याचं रवी राणा यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काय शंभुराजे, तुम्ही नवीनच असल्यासारखं…”, अधिवेशनात अजित पवार संतापले

शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता रवी राणा यांनी या पैशांवरून बच्चू कडूंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी “गद्दार सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, ५० खोके एकदम ओके” अशा घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला होता. “आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?” असा सवाल त्यावर बच्चू कडूंनी विरोधकांना केला होता. विरोधकांच्या अशा आरोपांना काही अर्थ नसल्याचेही कडू म्हणाले होते.

शिंदे विरुद्ध ठाकरे : सत्तासंघर्षाचा फैसला २५ ऑगस्टला होणार? प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग!

“तुम्हाला जर प्रत्येक आमदाराला किती खोकी दिली याबाबत माहिती होती तर तुम्ही अडवायचं होतं. आम्हाला थांबवायचं होतं, असेही कडू यांनी म्हटले होते. शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांनी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधक सत्ताधारी शिंदे गटाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badnera mla ravi rana criticized mla bacchu kadu on shivsena mla guwahati tour rvs
First published on: 23-08-2022 at 20:05 IST