फोन टॅपिंग प्रकरणी आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बुधवारी रात्री सागर बंगल्यावर भेट घेतली. रश्मी शुक्ला आणि फडणवीसांच्या या भेटीनंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीवरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.

“सागर बंगल्यात वॉशिंग मशीनच काम चालतं असेल”, असा खोचक टोला थोरातांनी फडणवीसांना लगावला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काल, बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फोन टॅपिंग प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्लांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

हेही वाचा- Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधकांची घोषणाबाजी

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो.’. ‘आले रे आले गद्दार आले’. ‘ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय. हाय’. अशी घोषणाबाजी सुरु केली होती. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्र्यांच्या वाईट वाटलं असून त्यांनी आपल्या मंत्र्यांना विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास सांगतिलं आहे. “अशा गोष्टी चालतचं राहणार आता मुख्यमंत्री याला काय उत्तर देतात हे बघूयात”, अशी प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे.

हेही वाचा- बच्चू कडू शिंदे सरकारवर नाराज? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने चर्चा; म्हणाले “व्यक्तिगत हितासाठी…”

शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी फोन टॅपिंग करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये २० शासकीय अधिकाऱ्यांसह शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा- “हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांना शिवसेना विकली होती”, काँग्रेस सोडताच नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

कंबोज यांचे तीन ट्वीट
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी बुधवारी रात्री अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे राजकारणात खळबळ उडाली असतानाच या भेटीमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे.