कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना राज्य शासनाच्या सेवेत प्रधान सचिवपदी बढती मिळाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून काम करण्याचे आदेश सोमवारी निर्गमित झाले आहेत. कोल्हापुरात शिक्षण झालेले भूषण गगराणी आणि इचलकरंजीत शिक्षण झालेले विकास खारगे या दोघांना एकाचवेळी संधी मिळाल्याने कोल्हापूरकरांनी समाज माध्यमातून आनंद व्यक्त करीत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूषण गगराणी यांनी कोल्हापुरात शिक्षण घेतले. कोल्हापूर हायस्कुल येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी न्यू कॉलेज येथून पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील शिक्षक होते. ते १९९० मधील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, रस्ते विकास महामंडळ येथे काम केले आहे. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. १९९९ ते २००३ या कालावधीत ते मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत होते.

तर, इचलकरंजी नगरपालिकेच्या राजर्षी शाहु हायस्कुल आणि व्यंकटराव हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेले विकास खारगे हे १९९४ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत चंद्रपुर, नागपूर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सचिव म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि संचालक, वन विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना आधुनिकतेचा वापर करून राज्यात ५० कोटीहून अधिक वृक्ष लागवड केली. याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला ‘अर्थ केअर’ हा मानाचा पुरस्कारही मिळाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhushan gagrani vikas kharge elected as principal secretary msr
First published on: 09-12-2019 at 21:01 IST