लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यात आल्यानंतर अशा प्रकारचे शब्द बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी दाखवतो, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

नारायण राणे काय म्हणाले?

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मातोश्रीवर जाऊन पाच वर्ष झाले, तरी त्याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करु शकले नाहीत. महाराष्ट्राला मागे नेणारे मुख्यमंत्री ते होते. उद्धव ठाकरे हे तेच तेच सांगून आणि अभद्र, अपशब्द वापर आहेत. मात्र, सत्ता गेल्यामुळे ते चिंतेने वैफल्यग्रस्त झाले आहेत”, असा निशाणा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या

परत जायचा रस्ता आम्ही दाखवतो…

नारायण राणे पुढे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी पक्ष काही वर्षात संपवला. ते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणत्या भाषेत बोलत आहेत. पण आता मी खासदारकी लढवत आहे. ते इकडे कोकणात येतील, या आणि असे शब्द सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवा. मग परत जायचा रस्ता कुठून आहे ते आम्ही दाखवतो. हे चालणार नाही”, असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्यावतीने ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे विनायक राऊत आणि नारायण राणे हे आमनेसामने आहेत. त्यामुळे विनायक राऊत हॅटट्रिक करणार की नारायण राणे मुलाच्या पराभवाचा वचपा काढणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे.