पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याची गरज नाही. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येईल, असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती ही खोटं बोल पण रेटून बोल अशी झाली असल्याचे म्हणत पाटील यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा-  “मला तरी कुठे माहिती होतं की मी CM होणार, हा तर…”; शिंदे ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचा उल्लेख करत म्हणाले, “स्वत:ची संपत्ती…”

चंद्रकांत पाटील म्हणाले की, वेदांत फॉक्सकॉन विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मांडणी केली आहे. पण, महाविकास आघाडीचे नेते तेच तेच बोलून जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जळगाव येथील आणि आदित्य ठाकरे यांची सिल्लोड येथील सभा रद्द झाल्याने शिंदें- फडणवीस सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. याला प्रतिउत्तर देत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेचा गैरवापर केला. त्याची यादी काढली तर दिवस पुरणार नाही. सोशल मिडियावर रियाक्ट झालं तरी पोलीस ठाण्यात घेऊन जायचे. घरात घुसून मारत होते हे ते विसरले आहेत का? त्यांनी सत्तेचा अडीच वर्षे दुरुपयोग केला आहे. असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will win more than 400 seats in 2024 elections said chandrakant patil dpj kjp
First published on: 05-11-2022 at 16:05 IST