भाईंदर- एका तरुणीला ती खालच्या जातीची असल्याचे कारण देत प्रियकराने लग्नास नकार दिला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याने पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून प्रियकराविरोधात नवघर पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित गुजराथी तरुणी २९ वर्षांची असून ती भाईंदर येथे राहते. २०१७ मध्ये तिची ओळख सागर जैन या तरुणाशी झाली. दोघेही एकाच कार्यालयात काम करत होते. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी सागर याने पीडीत तरुणीशी वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या काळात लग्न करत असल्याचे सांगत तिच्याकडून विविध कारणं देत ११ लाख रुपये घेतले होते. मात्र पीडितेने लग्नासाठी विचारणा केली असता ती खालच्या जातीची असल्याने लग्न करू शकत नसल्याचे त्याने सांगितले.

मुलाची मावशी पिंकी जैन आणि भाऊ आकाश जैन यांनीही पीडितेला ती खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्न होऊ शकणार नाही असे सांगितले. यामुळे तरूणीला मोठा धक्का बसला. ६ वर्ष प्रेमसबंध ठेवले, मात्र लग्न करताना जात आडवी आली होती. यानंतर पीडित तरुणीने प्रियकर आणि त्याच्या कुटुंबियावर फसवणुकीचा आरोप करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी आरोपी सागर जैन, त्याचा भाऊ आकाश जैन आणि पिंकी जैन यांच्या विरोधात विनयभंग (३५४) बलात्कार ३७६(२)(एन) फसवणूक ४२० तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम ३ (डब्ल्यू) (१) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.