मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाटा जवळ एकाच ठिकाणी दोन अपघातात सहा प्रवाशांचे बळी गेले असून याप्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांना प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून प्रथमच एखाद्या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

24 तासाच्या आत एकाच ठिकाणी खड्यांनी घेतला 6 जणांचा बळी

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आमगाव फाटा येथील उड्डाण पुलावरील खड्ड्यात 24 तासांच्या आता एकाच ठिकाणी झालेल्या दोन भीषण अपघात सहा जणांचा बळी घेतला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाण पुलावर सोमवारी रात्री कार आणि आयसर टेंम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर  मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अन्य एक कार आणि टेंम्पो यांच्यामध्ये पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पद्धतीने भीषण अपघात झाला त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा : दिल्लीतील भाजपा नेत्यांच्या बारामती दौऱ्यावरुन पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले “स्वत: पंतप्रधान…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख दुरुस्ती करणारी ठेकेदार कंपनी आर.के जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी यांच्यावर आज तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार कंपनी महामार्ग देखरेख दुरुस्तीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष व निष्काळजी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. तलासरी पोलिस ठाण्यात व्यवस्थापक राम राठोड व संबंधित अधिकाऱ्यांवर IPC 304 a, 279, 337,338, 427,34 mvact 184 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावले करत आहेत.