महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंचं ओझं झालं आहे. १ मेला महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची सभा ही शेवटची असेल. यानंतर ‘वज्रमूठ’ सभा होणार नाही, असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला होता. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

“कोण नितेश राणे? त्याला अक्कल आहे का? काहीही बडबड करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबद्दल एकेरी बोलतो. हे भाजपाला कसं आवडतं. तो काही कामाचा नाही. संजय राऊत यांच्यावर भुंकण्यासाठी त्यांना पाठवलं आहे. काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे वडील सोनिया गांधींचे पाय दाबत कौतुक करत होते. नंतर सोनिया गांधींना शिव्या दिल्या,” असं शिवसेना ( ठाकरे गट ) नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “पालकमंत्री घटनाबाह्य, त्यांचं भाषण…”, चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुमरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

अजित पवारांबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे, याबद्दल विचारल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं, “महाविकास आघाडी शरद पवारांनी स्थापन केली आहे. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. मग ते काकांना सोडून कसे जाऊ शकतात. भाजपाचे लोक वावडे उठवतात.”

हेही वाचा : “…तर विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूर लोकसभा लढवावी”, खासदार बाळू धानोरकरांचं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नितेश राणेंना चांगल्या डॉक्टरकडे नेण्याची गरज”

“नितेश राणे हे काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. नितेश राणेंनी काँग्रेसची चाकरी केली आहे. नितेश राणे नाही ओरडले, तर त्यांना भाजपातून काढून टाकतील. त्यांना एवढंच काम आहे. त्यामुळे नितेश राणेंना चांगल्या डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे,” अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी केली आहे.