मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डींतून अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Maharashtra News Live : अजित पवार आज घेणार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट; नेमकं कारण काय? जाणून घ्या प्रत्येक अपडेट…

What Priyanka Gandhi Said?
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
chandrashekhar Bawankule Directs BJP Core Committee for Effective Campaign in Wardha Constituency
“काम बरोबर नाही, आत्ताच सावध व्हा,” चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा; वाचा…

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“पंकजा मुंडे पाथर्डीतून लढणार की परळीतून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. कोणी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. त्यामुळे यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“…म्हणून आरोपपत्रात अजित पवारांचं नाव नसेल

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्र अजित पवारांचं नाव नसल्याबाबतही भाष्य केलं. “या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ईडीला अजित पवारांबाबत काहीही आढळलं नसेल, त्यामुळे आरोपपत्रात त्याचं नाव नसेल. त्यामुळे ईडीच्या आरोपपत्रावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं बरोबर नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “…तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले, “नाराजी कसली…”

“…तरीही आमच्याकडे १८४ आमदारांचं बहुमत”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर भाजपाने काही रणनिती ठरवली आहे का? असं विचारलं असता, “रणनिती ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात कोर्टाचा निकाल काहीही आला तरी आमच्याकडे १८४ आमदारांचं बहुमत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.