scorecardresearch

“धीरेंद्र महाराजांनी ‘या’ २१ जणांच्या ATM चे पासवर्ड सांगावे आणि २१ लाख रुपये बक्षीस जिंकावे”, छत्रपती सेनेचे खुले आव्हान

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ३० लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दिल्यानंतर आता अमरावतीच्या छत्रपती सेनेने धीरेंद्र महाराजांना २१ लाख रुपयांचे खुले आव्हान दिले आहे.

“धीरेंद्र महाराजांनी ‘या’ २१ जणांच्या ATM चे पासवर्ड सांगावे आणि २१ लाख रुपये बक्षीस जिंकावे”, छत्रपती सेनेचे खुले आव्हान
धीरेंद्र महाराज व छत्रपती सेनेचे अध्यक्ष नरेंद्र कठाने (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या देशभरामध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप केला. तसेच धीरेंद्र महाराजांनी ते सांगत असलेले दावे नागपूरला येऊन सिद्ध करावे आणि ३० लाख रुपयांचे बक्षीस घ्यावे, असं आव्हान श्याम मानवांनी दिलं. यानंतर आता अमरावतीच्या छत्रपती सेनेने धीरेंद्र महाराजांना २१ लाख रुपयांचे खुले आव्हान दिले आहे.

छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत धीरेंद्र महाराजांविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी धीरेंद्र महाराज लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. तसेच धीरेंद्र महाराजांनी छत्रपती सेनेच्या आमच्या २१ कार्यकर्त्यांच्या एटीएमचे पासवर्ड सांगावे. ते बरोबर सांगू शकले, तर त्यांना २१ लाख रुपयांचे बक्षीस देऊ अशी घोषणा छत्रपती सेनेचे अध्यक्ष नरेंद्र कठाणे यांनी केली.

नरेंद्र कठाने म्हणाले, “धीरेंद्र शास्त्री महाराज, देवकीनंदन ठाकूर आणि प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात आज आम्ही एक दिवसाचा बैठा सत्याग्रह करत आहोत. हे तिघेही गरीब जनतेचा पैसा लुटून ऐशोआरामात जगत आहेत. विदेशात फिरत आहेत. दुसरीकडे भोळीभाबडी जनता अजूनही गरिबीत रस्त्यावर फिरत आहे.”

हेही वाचा : VIDEO: “धीरेंद्र महाराजांवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, कारण…”, नागपूर पोलीस आयुक्तांचं मोठं विधान

हेही वाचा : VIDEO: नागपूर पोलिसांचा धीरेंद्र महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार, श्याम मानव म्हणाले, “आता…”

छत्रपती सेनेने अमरावतीमध्ये धीरेंद्र महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलनही केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 22:18 IST

संबंधित बातम्या