दापोली : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर बोगदा भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन व एल अँड टी प्रशासनाकडून कशेडी बोगदा मार्गे शनिवारी दुपारी अडीज वाजताच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र बोगदा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

कशेडी बोगदामार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगलामार्गे वळवून सुरू करण्यात आली होती. मात्र या मार्गावरील एका मार्गिकेचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार व रामागडे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Waqf Board : वक्फ बोर्डाला १० कोटींचा निधी देण्याचा ‘तो’ निर्णय अखेर रद्द; भाजपा म्हणते, “प्रशासनानं परस्पर…”

हेही वाचा – Video: आता पैसे देऊन महिलांना गावकुसाबाहेरच ठेवलंय – गिरीश कुबेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवीन मार्गावरून एसटीसह ट्रक टेम्पो कारसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी बोगदामार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळेसह इंधनाची बचत होऊन प्रवासही सुसाट होत असल्याने सर्वच वाहनचालक या मार्गाने जाणे पसंत करतात. त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे. जुन्या मार्गावरील कशेडी बंगला पंचक्रोशी येथील स्थानिक नागरिक व प्रवाशांना जाण्या येण्यासाठी वाहने मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. किमान चिपळूण, खेड व महाड आगारातील एसटी बसेस या कशेडी बंगला मार्गे सोडण्यात याव्या, अशी मागणी या विभागातील नागरिकांकडून केली जात आहे.