Devendra Fadnavis on Raj And Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या दोन्ही पक्षांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याकरता दोन्ही पक्षांच्या नेतेमंडळींकडून प्रयत्न सुरू असल्याचंही म्हटलं जातंय. फक्त या युतीकरता कोणता पक्ष किंवा पक्षनेतृत्त्व पुढाकार घेणार याची वाट पाहिली जात आहे. दरम्यान, या संभाव्य युतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज गडचिरोली येथे माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरेंकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव आला तर त्यावर राज ठाकरेंकडून विचार केला जाईल, अशी मनसेची भूमिका आज संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी व्यक्त केली. तर, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे, ते होईल, अशी सकारात्मक भावना उद्धव ठाकरेंनी आज बोलून दाखवली. तर, या दोन्ही नेत्यांमध्ये एव्हाना फोनवरू चर्चा झालीही असेल, असं सूचक वक्तव्य आज संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता अधिक प्रबळ होत जातेय. याबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यावर काय प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्यात? त्यामुळे ते आपसांत ठरवतील, की यांनी साथ द्यायचीय, त्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही.”

मी उचितवेळी बोलेन

ते पुढे म्हणाले, “आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मी योग्यवेळी बोलेन. मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचितवेळी सांगत असतो”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं

दरम्यान, हाच प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. महायुती भक्कमपणे काम करेल असंच ते म्हणाले.