महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सभास्थळी जोरदार तयारी केली जात आहे. असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे. राज ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आज मनसे-शिंदे गट युतीची घोषणा होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर, मनसे-शिंदे गटामध्ये मनं जुळली का? असा प्रश्न विचारल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “मनं जुळली किंवा मतं जुळली का? हे सगळं आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.

हेही वाचा- फडणवीसांऐवजी विनोद तावडे असतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा? भाजपाच्या अंतर्गत गटबाजीवर तावडेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत अधिक माहिती देताना राजू पाटील म्हणाले, “आज पहिल्यांदा गणपती संस्थानच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी मीही तिथेच होतो. त्यांना मी विनंती केली की मनसेचं कार्यालय बाजुलाच आहे, येता का? यानंतर मुख्यमंत्र्यांनी काहीही वेळ न दवडता त्यांनी आमच्या विनंतीला मान देत मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. दिवसांतील २४ तास आणि वर्षातील १२ महिने कुणीही राजकारण करत नाही. काही गोष्टी संस्कृतीच्या आणि सामाजिक सलोख्याच्या असतात. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री मनसे कार्यालयात आले होते.”

हेही वाचा- “मी अपघाताने राजकारणात आलो”, सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंचं भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गट आणि मनसेची मनं जुळली का? असं विचारलं असता राजू पाटील पुढे म्हणाले, “मनं जुळली किंवा मतं जुळली, हे सगळं आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील. हा आमचा विषय नाही.”