अलिबाग : मद्यपि चालकाला बाजुला करीत एस टी कंडक्टरने ६० किलोमीटर एस टी बस चालवल्याची घटना रायगडमधुन पुढे येत आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळची असुन श्रीवर्धन ते मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चालका विरुद्ध रामवाडी येथील एस टी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली . आबाजी धडस असे त्याचे नाव असून या मद्यपि चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा… नागपूर : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, तलावालगतच्या भागात दाणादाण; घराघरात पाणी शिरले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

हेही वाचा… पुणे : सिंहगडावर आता ‘सिग्नेचर वाॅक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीवर्धन ते मुंबई एस बस संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन स्थानकातून निघाली. बस माणगाव एस टी स्टँड येथे थांबली असता चालकाने तेथेच मद्यपान केले. चालकाने मद्यपान केल्याचे कंडक्टरच्या लक्षात येताच त्याने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. त्यानंतर कंडक्टर हा कंडक्टर कम ड्रायव्हर असल्याने मद्यपी चालकाला बाजुला करीत कंडक्टरने एस टी बस ताब्यात घेतली. पुढे सुमारे ६० किलो मिटर गाडी चालवत आणली. रामवाडी येथे गाडी असताना चालकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली.