कराड : यशवंत सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी जारी केले आहेत. तर, बँकेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जे. पी. शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बँकेच्या कराडमधील मुख्यालयात पदभारही घेतला आहे.

यशवंत बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आणि त्यानंतर लगेचच सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाने संचालक मंडळ बरखास्तीची कार्यवाही झाली आहे. तसेच बँकेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील जे. पी. शिंदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशवंत बँकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने वैधानिक निरीक्षण केले होते. सततच्या अनियमितता आणि उल्लंघनांमुळे रिझर्व्ह बँकेला खात्री झाली आहे की, बँकेचे कामकाज ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने यशवंत बँकेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिलेत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या कलम ११०- अ मधील तरतुदींनुसार त्यातील कारणांसाठी प्रशासक नियुक्तीचे आदेश सहकार आयुक्तांना दिले आहेत