एकीकडे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुसरीकडे अफवांचं पीक उठलं आहे. अशीच एक अफवा समाजमाध्यमांवर पसरली असून आरोग्य विभागाने त्यावर खुलासा केला आहे. करोनाची लागणी झाली आहे की नाही यासाठी रक्त तपासणी होत असून, महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत आहे, आरोग्य विभागाने यावर खुलासा करत हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे.
खुलासा करताना काय म्हटलं आहे ?
राज्यात संशयित रुग्णांची करोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाच्या घशाचा द्रव घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढवण्यात येणार आहे.
आणखी वाचा- करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री
#CoronaVirusUpdate
कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्यामुळे #कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा; आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा#FactCheck pic.twitter.com/cmRf3OCMMv— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 18, 2020
आणखी वाचा- Coronavirus: ‘त्या’ एका टॅक्सीमुळे मुंबईत पाच जणांना लागण आणि एकाचा मृत्यू
सोशल मीडियावर सध्या करोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.