करोनाचा संकट वाढल्यानं देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे अनेकजण घरापासून दूर अडकून पडले आहेत. अशा अडकून पडलेल्या लोकांच्या मदतीसाठी तुळजापूर येथील शेतकरी धावून आला आहे.

करोनामुळे अनेकांना वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात अडकून पडावे लागले आहे. अशा नागरिकांसाठी राज्य सरकारनं जेवण आणि राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर इतर अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी धावून आल्या आहेत. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघून एक शेतकरी मदतीसाठी धावून आला आहे.

भारतावरच नाही, तर जगावर संकट आलेलं आहे. भारताबरोबरच जग याचा सामना करत आहे. या स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या शेतकऱ्यांन एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. तो क्रिकेटपटू आदित्य राहाणेन ट्विट केला आहे. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहे. अशात अडकून पडलेल्या लोकांच्या जेवणाची वाईट स्थिती आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक लोक समोर येत आहे. मी एक गरीब शेतकरी आहे. मी आर्थिक मदत करू शकत नाही. पण, सरकारला विनंती आहे की, माझी दोन एकरातील केळी द्यायची आहे. ही केळी गरीब, गरजू लोकांच्या तोंडी गेली तर मला समाधान मिळेल,’ असं आवाहन या शेतकऱ्यानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध राज्यात आणि शहरात अडकलेले नागरिक धोकादायक मार्गानं प्रवास करत असल्याच्या घटना लॉकडाउननंतर समोर आल्या. हे स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं पावलं उचलत स्थलांतर करणाऱ्या लोकांची व्यवस्था केली. त्याचबरोबर त्यांना कुठेही न जाण्याचं आवाहन केलं आहे.