कराड :  पुण्यातील कोथरूड परिसरात नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ खून प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली.  शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना येथील सराईत गुन्हेगार धनंजय मारुती वटकर याने पिस्तूल पुरविल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याने पुण्याच्या पोलीस पथकाने वटकरला अटक केली. धनंजय वटकरवर कराड शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील कोथरूडमध्ये शरद मोहोळ यांचा भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात होता. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहचले. शरद मोहोळ खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके ठिकठिकाणी रवाना  केले होते. त्यातील एका तपास पथकांने पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली.  अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. त्यानुसार मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे माहिरी समोर आली.

हेही वाचा >>>“२७ आयफेल टॉवर उभे राहतील, पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली अटल सेतूची वैशिष्ट्ये

पुणे पोलिसांनी कराडातील धनंजय वटकर या पोलिसांच्या दप्तरी सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असल्याने पिस्तुल तस्करीत कराड केंद्रस्थानी आहे का? याबाबत उलट- सुलट चर्चा होवू लागली आहे. पोलिसांना आणखी काही महत्वाची माहिती मिळाल्याचे समजते. धनंजय वाटकर याच्यावर कराडातही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च २०२३ मध्ये ,१४ पिस्तुलांसह दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यात हा वटकरही गजाआड झाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal arrested in sarai on suspicion of showing pistol to murderers of sharad mohal amy
First published on: 11-01-2024 at 23:51 IST