Dasara Melava 2022 Latest News: आज संपूर्ण राज्याचं लक्ष शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्याकडे असणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याच्या भाषणांमध्ये काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा दोन्ही बाजूंकडून प्रयत्न असेल. पण त्याआधीच शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश कऱणार असल्याचं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

काय म्हणाले कृपाल तुमाने –

कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की “मी गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावं यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळालं आहे”.

‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

“राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जे आमदार, खासदार प्रवेश कऱणार आहेत त्यांची नावं संध्याकाळीच सर्वांना कळतील. मुंबई, मराठवाडा कुठलेही ते असू शकतात. प्रभावी खासदार आमच्याकडे आलेले दिसतील. ज्या आमदारांना, खासदारांना आमचे विचार पटत आहेत, ते आमच्याशी संपर्क साधत सोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. जे येतील त्यांना सोबत घेऊ,” असं त्यांनी सांगितलं.