List of All Ministers in Maharashtra 2024 BJP : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. या निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीला मोठं बहुमत मिळालं. महाराष्ट्रात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केला. विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. मोठं बहुमत मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले. पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्तास्थापन केली. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यातील जनतेला महायुती सरकारच्या विस्ताराची प्रतीक्षा होती. अखेर सत्तास्थापनेनंतर १० दिवसांनी आज (१५ डिसेंबर) नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
महायुतीच्या ३९ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे. आज ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यापूर्वी देखील राज्यात महायुतीचं सरकार होतं. मात्र, नव्या सरकारमध्ये काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. नव्या सरकारमध्ये भाजपाने नऊ, शिवसेनेने (शिंदे) सहा व राष्ट्रवादीने (अजित पवार) पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी
भाजपाच्या २० मंत्र्यांची यादी
| क्र. | मंत्र्याचं नाव | मंत्रीपद |
| 1 | देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री |
| 2 | चंद्रकांत पाटील | कॅबिनेट मंत्री |
| 3 | मंगलप्रभात लोढा | कॅबिनेट मंत्री |
| 4 | राधाकृष्ण विखे पाटील | कॅबिनेट मंत्री |
| 5 | पंकजा मुंडे | कॅबिनेट मंत्री |
| 6 | गिरीश महाजन | कॅबिनेट मंत्री |
| 7 | गणेश नाईक | कॅबिनेट मंत्री |
| 8 | चंद्रशेखर बावनकुळे | कॅबिनेट मंत्री |
| 9 | आशिष शेलार | कॅबिनेट मंत्री |
| 10 | अतुल सावे | कॅबिनेट मंत्री |
| 11 | संजय सावकारे | कॅबिनेट मंत्री |
| 12 | अशोक उईके | कॅबिनेट मंत्री |
| 13 | आकाश फुंडकर | कॅबिनेट मंत्री |
| 14 | जयकुमार गोरे | कॅबिनेट मंत्री |
| 15 | शिवेंद्रराजे भोसले | कॅबिनेट मंत्री |
| 16 | नितेश राणे | कॅबिनेट मंत्री |
| 17 | जयकुमार रावल | कॅबिनेट मंत्री |
| 18 | माधुरी मिसाळ | राज्यमंत्री |
| 19 | मेघना बोर्डीकर | राज्यमंत्री |
| 20 | पंकज भोयर | राज्यमंत्री |
हे ही वाचा >> Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी
| क्र. | मंत्र्याचं नाव | मंत्रीपद |
| १. | एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री |
| २. | गुलाबराव पाटील | कॅबिनेट मंत्री |
| ३. | दादा भूसे | कॅबिनेट मंत्री |
| ४. | संजय राठोड | कॅबिनेट मंत्री |
| ५. | उदय सामंत | कॅबिनेट मंत्री |
| ६. | शंभूराज देसाई | कॅबिनेट मंत्री |
| ७. | संजय शिरसाट | कॅबिनेट मंत्री |
| ८. | प्रताप सरनराईक | कॅबिनेट मंत्री |
| ९. | भरत गोगावले | कॅबिनेट मंत्री |
| १०. | प्रकाश आबिटकर | कॅबिनेट मंत्री |
| ११. | आशिष जैस्वाल | राज्यमंत्री |
| १२. | योगेश कदम | राज्यमंत्री |
यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
हे ही वाचा >> Maharashtra Cabinet : नव्या मंत्रिमंडळात का नाहीत भुजबळ, वळसे-पाटील? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कोणत्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली?
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- हसन मुश्रीफ
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद जाधव
- इंद्रनील नाईक
- माणिकराव कोकाटे

