बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजपा नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी केलेल्या भाषणातू पंकजा मुंडे यांनी विविध राजकीय चर्चांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, आपण पक्षात नाराज नाही. पक्षानं तिकीट दिलं तर २०२४ सालच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेच्या विधानानंतर परळी मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंच्या आव्हानावर भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले “प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी पक्ष निवडणूक लढवण्याची संधी देतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला त्या-त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते.”

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Supriya Sule Sunetra Pawar
“बारामतीत माझ्याविरोधात…”, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या

हेही वाचा- “….तर मी दुर्गेचं रुप धारण करेन”, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

“निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कुणी कुठून निवडणूक लढवावी आणि कुठून निवडणूक लढवू नये, हा निर्णय ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढवावीच लागेल. शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे मायबाप जनता ठरवेल” अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा- Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
सावरगाव येथील दसरा मेळाव्यात समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, निष्ठा आहे, माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला शोभेल असं वागा. पक्षाने तिकीट दिलं तर मी २०२४ च्या तयारीला लागणार आहे.”