सांगली : धनगर आरक्षणाचा मुद्दा हा तांत्रिक बाबीमध्ये असून हा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धनगर समाजाने वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

हेही वाचा – नीट, एमएचटी-सीईटी एकाच दिवशी, सीईटी सेलवर दोनच दिवसांत पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ!

हेही वाचा – राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

हेही वाचा – साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मिरज येथे रमजान निमित्त आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीवेळी ते बोलत होते. यावेळी पडळकर म्हणाले, धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा तांत्रिक विषय बनला आहे. आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावला जाईल.